चंद्रभागेत आंघोळ केली, दर्शनाला निघाले पण नियतीच्या मनात भलतंच, वारकऱ्यासोबत वाईट घडलं.

बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील कवठळ येथील वारकऱ्याचा पंढरपूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आषाढी एकादशीनिमित्त गावकऱ्यांसोबत दर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या रामदास यांना चंद्रभागेत स्नान करून मंदिरात जात असताना त्यांचा मृत्यू झाला.रविवारी सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह बहुतांश विशेषतः शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागातील भाविक भक्त हे थेट पंढरपूरला जाऊन विठुरायाला आपल्या डोळ्यांमध्ये त्याचे गोजरवान रूप एक क्षण पाहण्याकरता आतुर झाले असता .आणि याकरता ते थेट पंढरीत दाखल होतात. मात्र बुलढाण्यात एक दुःखद घटना समोर आली आहे पंढरीच्या वारीत गेलेला वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि विठुरायाच दर्शन घेण्याआधीच मृत्यूने त्याला कवटाळले.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी असलेले 42 वर्ष रामदास पडघान हे पंढरपूरला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला असता. लगेच सोबत असलेल्यांनी त्यांना रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना 5 जुलै रोजी सायंकाळी घडली.अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कवठळ येथील 40 ते 50 जण भाविक दरवर्षी पंढरपूरला आषाढीनिमित्त दर्शनासाठी जातात. यावर्षी सुद्धा गावातील भाविकांसोबत रामदास हे पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी चंद्रभागेत आंघोळ करून मंदिराकडे जात असताना रस्त्यावरील फळे विकत घेतली .आणि सर्वजण एका ठिकाणी बसून फळे खात होते.

दरम्यान रामदास पडघान यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्या. हे पाहून सोबतच्या गावकऱ्यांनी मंडळांनी त्यांना लगेच जवळच्या रुग्णाण्यात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मर्ग दाखल केला .या घटनेमुळे पंढरपूरला गेलेले सर्वजण मृतक रामदास पडघन यांना घेऊन गावी परतले. या घटनेमुळे गावात दुःखाचे सावट पसरले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या मागील पत्नी एक मुलगा मुलगी आई-वडील यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.