दुर्दैवी! ‘तू घरी जा, मी नंतर येतो!’ पत्नीला घरी पाठवलं; पण काळाने शेतमजुराची वाट अडवली, रस्त्यात नको ते घडलं.

आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे शेतातच थांबले.घाटंजी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला.

रविवारी या दोन घटना समोर आल्या.रविवारी दुपारपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने वाघाडी नदीच्या कोपरी-येरंडगाव रस्त्यावरील चिंचोली गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते. यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला. संजय तुरक पाटील यांच्यासह स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नदीला आलेल्या पुराचा प्रवाह इतका जोरदार होता की मृतदेह पुढे तरोडा गावाच्या दिशेने वाहून गेला. संध्याकाळपर्यंत या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.शिरोली येथे संभाजी भुऱ्या आत्राम (६०) या मजुराचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्राम हे पत्नी शांता यांच्यासोबत श्रावण पवार यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होते. सकाळी ८.३०च्या सुमारास दोघे शेतात गेले होते. दिवसभर काम केल्यानंतर पत्नी शांता घरी परतली, मात्र संभाजी हे शेतातच थांबले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून नातेवाइकांनी शोध सुरू केला. मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ते नाला ओलांडताना वाहून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. रविवारी दुपारी माणिक विठ्ठल आत्राम यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात झाडाला अडकलेल्या अवस्थेत संभाजी यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंट अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.