घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार, पुढील दोन दिवस धो-धो बसरणार; ‘या’ भागांत रेड अलर्ट जारी.

 राज्यात मंगळवार, ८ जुलैपर्यंत कोकण तसेच घाट परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे घाट परिसरात रविवार आणि सोमवारी ‘रेड ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे आणि ठाणे, पालघरला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे.राज्यात मंगळवार, ८ जुलैपर्यंत कोकण तसेच घाट परिसरात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

घाट परिसरात काही ठिकाणी ६ आणि ७ जुलैला तीव्र अतिरिक्त पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट परिसरात रविवार आणि सोमवारी ‘रेड ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे.पश्चिम बंगालच्या गंगेच्या प्रदेशात आणि लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातावरण निर्माण झाले आहे. गुजरातपासून पश्चिम बंगालच्या गंगेच्या प्रदेशाच्या उत्तर भागापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड या राज्यांवरही आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मंगळवारपर्यंत पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता असल्याचे शुक्रवारी प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी आज, ६ जुलै आणि सोमवार, ७ जुलै रोजी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो.मुंबईत ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. आज, रविवारी ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारीही ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. रत्नागिरीत मंगळवारपर्यंत पावसाचा जोर अधिक राहील. नाशिक घाट परिसरात सोमवारपर्यंत ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात मध्यम पाऊस असेल, तर पुणे घाट परिसरात मात्र अतितीव्र मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. सातारा घाट परिसरातही मंगळवारपर्यंत ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. या कालावधीत पठारी प्रदेशात म्हणजे घाटमाथ्याच्या पलीकडच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मध्यम राहील असा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.