सगळे गाढ झोपलेले, अचानक बस पुलावरुन थेट नदीत कोसळली, जळगावात मोठा अनर्थ टळला.

इंदोर-जळगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून एक खाजगी बस आमोदा नदीच्या पुलावरून बॅरिकेट तोडून नदीत कोसळली. या दुर्घटनेत एका प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. धोकादायक रस्त्यावर मागील महिन्यात 26 अपघात झाले आहेत.जळगावात भीषण अपघात झाला आहे. इंदोर ते जळगाव या मार्गावरुन येणाऱ्या खाजगी बसचा आज रविवारी पहाटे अपघात झाला. आमोदा मूळ नदीच्या पुलावरून बॅरिकेट तोडून एक खाजगी बस थेट नदीत कोसळली. या बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते. बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदाजवळ इंदूरवरुन सकाळी जळगावकडे जात असताना एक खाजगी ट्रॅव्हल्स आमोदा पुलावरून खाली कोसळली. या नदीमध्ये सुदैवाने पाणी नव्हतं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र दुर्दैवाने एक मृत्यू झाला आहे. बस नदीत पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे.अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून नदीला पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.इंदूरवरुन भुसावळच्या दिशेने एमपी 09-9009 या क्रमांकाची लक्झरी बस येत होती. पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही बस आमदा गावाजवळील नदीवरील पुलावरुन जाताना चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळे बस थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.सुरू केलं. त्यांनी जखमींना रुगणालयात पोहचवण्यासाठी मदत केली. या संदर्भात फैजपूरपोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं. या अपघातामुळे आमोदा गावाजवळील मोरनदीवरील पूलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणीफैसपूर ते आमोदा दरम्यानच्या रस्त्यावर सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मागील आठ दिवसांमध्ये या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याबाबत चालकांनी बोलताना सांगितलं, की ब्रेक दाबल्यावर वाहनाचं चाक सरकत असल्याने वाहनांचा अपघात होत आहे. दररोज याच ठिकाणी वाहनांचे अपघात होत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यभारावर प्रश्न उपस्थित केलं आहे. गेल्या एका महिन्यात हा 26 वा अपघात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.