घोर कलियुग! पुण्यात जन्मदात्यांकडूनच काळजाच्या तुकड्याचा सौदा, ४० दिवसांच्या बाळाला…. धक्कादायक घटना.

सपकाळ दापत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. आर्थिक अडचणीमुळे सपकाळ यांनी बालिकेची विक्री करण्याचा ठरविले होते. येरवडा परिसरात ४० दिवसांच्या बालिकेचा बेकायदेशीररित्या साडेतीन लाख रुपयांत सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बालिकेच्या आई आणि वडिलांनी आर्थिक विवंचनेतून कोणतीही कायदेशीर दत्तक प्रक्रिया न पार पाडता बालिकेची विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे. येरवडा पोलिसांनी आई, वडिल, एजंट आणि बाळ खरेदी करणाऱ्या अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे.

आई मिनल ओंकार सपकाळ (वय ३०, रा. बिबवेवाडी), वडील ओंकार औदुंबर सपकाळ (२९, रा. सदर), साहिल अफजल बागवान (२७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (४४, रा. सदर) आणि दीपाली विकास फटांगरे (३२, रा. संगमनेर) यांना अटक केली आहे. भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२)१४३(३),१४३(४),३(४) सह बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दोन जुलै रोजी सकाळी नऊ ते १२ या वेळेत घडली असून, गुन्हा चार जुलैला नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ दापत्याला दीड महिन्यापूर्वी मुलगी झाली होती. आर्थिक अडचणीमुळे सपकाळ यांनी बालिकेची विक्री करण्याचा ठरविले होते. यादरम्यान ओळखीतून एजंटने सपकाळ यांना दोन लाख रुपयांत बाळाची विक्री करून, देतो असे सांगितले होते.आरोपींनी ग्राहक महिला दीपाली फटांगरे यांना कोणतीही कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया न पार पाडता सपकाळ दांपत्याची ४० दिवसांची मुलगी (जन्मतारीख २६ मे २०२५) सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात विकली. या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांनी मानवी अपव्यापारासारखा गंभीर गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे.सपकाळ दांपत्याला पैशांची गरज असल्याने त्यांनी पोटच्या मुलीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. एजंटच्या मदतीने ग्राहक महिलेला साडेतीन लाख रुपयांना बालिकेची विक्री केली. एजंटने दीड लाख रुपये कमिशन घेऊन दोन लाख रुपये सपकाळ यांना दिले. मात्र, बाळाची अधिक रकमेला विक्री करून आपल्याला दोनच लाख देऊन फसवणूक केल्याचा संशय आई-वडिलांना आला. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्यावर गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी आई-वडिल, एजंट आणि ग्राहक महिला अशा सहा जणांना अटक केली आहे. -रवींद्र शेळके, वरिष्ठ निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.