काकाने १६ वर्षीय पुतण्याला निर्घृणपणे संपवलं, कोल्ड्रिंकमधून दिलं विष, कारण ऐकून हादराल!

रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडली आहे.आपल्यासोबत बोलत नाही आणि भेटायला येत नाही, यामुळे रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडली आहे. मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी काकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नौशाद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते कुटुंबासह गोवंडी परिसरात राहतात. त्यांचा सख्खा चुलत भाऊ जिशान हादेखील याच परिसरात भाड्याने राहतो. तो मुलगा शाहिदला घेऊन वारंवार कुठेतरी जात असल्याने, तसेच त्याची वर्तणूक चांगली नसल्याने नौशाद यांनी शाहिदला त्याला भेटण्यास मनाई केली होती. मात्र, २९ जूनला शाहिद मित्रांसोबत गप्पा मारत असताना जिशान तेथे आला आणि त्याला जबरदस्तीने सोबत घेऊन गेला. जिशानसोबत असताना शाहिद बेशुद्धावस्थेत सापडला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शाहिदच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिशानने त्याला शीतपेय प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर त्याला उलटी झाली व नंतर तो बेशुद्ध पडला. यावरून जिशानने शीतपेयातून विष देऊन शाहिदला मारल्याचा नौशाद यांचा आरोप आहे.मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी एका प्रवाशाकडून रॅकून, ब्लॅक फॉक्स खार आणि इगुआनासह ४५ वन्यप्राणी जप्त केले. या तस्करीदरम्यान काही प्राण्यांचा गुदमरून मृत्यू झाला. थाई एअरवेजच्या विमानाने हा प्रवासी पहाटे शहरात पोहोचल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरच्या (आरएडब्ल्यू) तज्ज्ञांनी या प्राण्यांची सुटका करण्यासाठी मदत केली. जिवंत प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात येणार आहे. मात्र तस्करीदरम्यान अशा पद्धतीने प्राणी मृतावस्थेत आढळतात, हा अशा प्रकारे प्राणी पाळण्याबद्दलच्या प्रेमाची अत्यंत दुर्दैवी बाजू असल्याचे ‘आरएडब्ल्यू’तर्फे सांगण्यात आले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.