14000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; नीरव मोदीच्या भावाला अटक, आरोप काय?

सीबीआय आणि ईडीच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नेहल मोदीला शनिवारी, 5 जुलै रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. नेहलवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा ​आरोप असून अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेपासून दूर होता.पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ , नेहल मोदी, याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे.हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. नेहल मोदी अनेक दिवसांपासून फरार होता तर, ईडी आणि CBI कडून प्रत्यार्पणाच्या वारंवार विनंतीनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

अमेरिकन अभियोक्ता तक्रारीनुसार, नेहलवर PMLA च्या कलम 3 अंतर्गत मनी लाँड्रिंग आणि गुन्हेगारी कट रचणे व पुरावे नष्ट करण्याचे दोन आरोप आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, बेल्जियमची नागरिक नेहल मोदीला 4 जुलै रोजी ताब्यात घेतले गेले आहे.ईडी आणि सीबीआयच्या तपासात नीरव मोदीच्या वतीने गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशांच्या लाँडरिंगमध्ये नेहलने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. गुन्ह्यातील उत्पन्न लपवण्यासाठी त्याने बनावट कंपन्यांद्वारे आणि गुंतागुंतीच्या परदेशी व्यवहारांद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर निधी लपविण्यास आणि हस्तांतरित करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.दरम्यान, 17 जुलै रोजी प्रत्यार्पणाची पुढील सुनावणी होईल. या सुनावणीदरम्यान नेहल जामिनासाठी अर्ज करण्याची शक्यता ​असून अमेरिकेच्या अभियोजन पक्षाने सांगितले की त्यांच्याकडून या याचिकेला विरोध केला जाईल.त्याचवेळी, नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात ​असून स्वतःदेखील आर्थिक घोटाळ्यांमध्ये​ आरोपी आहे. ​निरव मोदीवर अनेक गंभीर आरोप ​असून आता त्याच्या भावाला अटक झाल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.​​ नेहल मोदीला झाल्याच्या बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) वापरून पीएनबीला सुमारे 13,500 कोटी रुपयांची कर्जे फसवल्याप्रकरणी नीरव मोदी, त्याचा काका मेहुल चोक्सी, नेहल आणि इतरांना CBI व ईडीच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने आधीच मान्यता दिली आहे पण, त्याने असंख्य अपील दाखल केल्यामुळे भारतात आणण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. लंडनच्या तुरुंगात नीरवला 2019 मध्ये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले.दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून 65 वर्षीय मेहुल चोक्सीला अँटवर्पमध्ये अटक करण्यात आल्याचे बेल्जीयम सरकारने सांगितले. 2018 मध्ये चोक्सी भारतातून पळून गेला आणि तेव्हापासून अँटिग्वा व बरबुडा येथे नागरिकत्व घेऊन राहत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.