पवना धरण परिसरात ठाकुरसाई येथे एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या दिनेश गरवड नावाच्या व्यक्तीची, त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली. दारूच्या नशेत दिनेशने प्रणव डेकाला शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात प्रणवने लोखंडी कुदळ डोक्यात घालून त्याचा खून केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रणवला अटक केली आहे.मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील ठाकुरसाई येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या एका सहकाऱ्याने दुसऱ्या सहकाऱ्याला दारू पिऊन शिवीगाळ केली. हा राग अनावर झाल्याने संबंधित तरुणाने शिवीगाळ करणाऱ्या सहकाऱ्याच्य डोक्यात लोखंडी कुदळ घालून त्याचा खून केला.










