‘थांब तुझा गेमच करतो’; प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, शिवीगाळ करत तिघांनी मारलं, पुण्यात खळबळ.

आकाश बनसोडेच्या पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ, ओठांजवळ, पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये आकाश बनसोडे याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. आकाश बनसोडे याला ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा यानंतर दाखल करण्यात आला.राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यात गुन्हे काही कमी होताना दिसत नाहीत.

दहशत मजवण्यासाठी हातात कोयते घेऊन तोडफोड करणाऱ्यांपासून खून, बलात्कार सारख्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. यातच भर म्हणजे वाघोलीतील रीलस्टार आकाश उर्फ आक्या बनसोडेवर धारदार शस्त्राने तिघांनी प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात आकाश बनसोडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांना वाघोली पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने संयुक्त कारवाई करत अटक केले आहे.आकाश बनसोडे हा वाघोली परिसरातील बाईक रोड या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्याचे उबाळे नगर येथे हिरो मोटार शोरूम समोर न्यू मेन्स वेअर कपड्यांचे दुकान आहे. गुरुवारी रात्री आकाश बनसोडे हा आपल्या दुकानात होता. त्यावेळेस त्याच्या दुकानात तीन जण अचानक आले आणि शिवीगाळ करत ‘थांब तुझा गेमच करतो’, असं म्हणत त्याच्यावर धारदार शास्त्राने वार करण्यास सुरुवात केली. या तिघांनी आकाश बनसोडे च्या पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ, ओठांजवळ, पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये आकाश बनसोडे याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. आकाश बनसोडे याला ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा यानंतर दाखल करण्यात आला.याप्रकरणी ज्ञानोबा जाधव (वय १८) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आपले घर, खराडी येथे राहणाऱ्या अनिकेत दीपक वानखेडे, प्रवीण गोविंद माने व एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. वाघोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.