इथेच धंदा, व्यवसाय करता, मग मराठी बोलायची कसली लाज वाटते? सुशील केडियांवर भडकले भरत जाधव.

सुशील केडिया या व्यावसायिकाने मराठी भाषेचा अपमान केला. त्याप्रकरणी वातावर तापले आहे. यावर अभिनेते भरत जाधव यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.आजच्या दिवसाकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तमाम मराठी आणि हिंदू जनतेच्या मनातला तो क्षण याची देही याची डोळा पाहण्याची संधी सर्वांना मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आजच्या दिवशी मराठी भाषेसाठी एकत्र आले. वरळी येथे हा विजय मेळावा साजरा झाला. या क्षणी त्या डोम मध्ये हजारो नागरिकांची गर्दी जमलेली. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचा सुद्धा समावेश होता.

या मराठी भाषा विजय सोहळ्यात अभिनेते भरत जाधव यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर त्यांचे मत व्यक्त केले. भरत जाधव म्हणाले की, प्रत्येक जण आपला मत व्यक्त करतोय. पण मला वाटतं की मराठी माणसाने आता तरी जागं व्हायला हवं. आपलं मराठीपणा जपायला हवा. माझं असं म्हणणं नाहीये की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदी भाषा पण चांगलीच आहे पण त्याची सक्ती नसावी याच गोष्टीवर आपण आहोत.याशिवाय काल मीरा-भाईंदर येथे घडलेल्या घटने नंतर उद्योजक सुशील केडिया यांचा देखील नाव चर्चेत आलं. माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठी वरचा राग बोलून दाखवला होता त्यामुळे वातावरण चांगलंच पेटलेलं. त्यावरही भरत जाधव यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की इथे येऊन तुम्ही धंदा करता, तुमचा व्यवसाय करता… मग मराठी बोलायची लाज का वाटते? मग अभिमानाने सांगता कशाला की 30 वर्ष मी इथे राहतोय. इथेच तुम्ही बिझनेस करता, ‌ मराठी माणसांवर राज्य करता आणि त्यांनाच लांब करता! ही खूप चुकीची गोष्ट आहे मी याचा निषेध करतो.मराठी भाषा विजय मेळाव्या बद्दल बोलायचे झाल्यास या सोहळ्यात तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या कार्यक्रमात दोघांनीही मराठी भाषा विरोधकांवर टीकास्त्र सोडली. तसेच देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये भाषा आणि जाती वरून कशी फुट पाडतायेत याबद्दल भाषण दिले. या कार्यक्रमाला सिद्धार्थ जाधव आणि तेजस्विनी पंडित हे कलाकार सुद्धा उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.