हिमाचल प्रदेशात पावसाचं थैमान! दोन आठवड्यांत ४५ जणांचा मृत्यू; ३७ बेपत्ता, ‘या’ भागात ८ जुलैपर्यंत अलर्ट जारी.

मान्सून दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यांत ढगफुटी, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ जण बेपत्ता आहेत.हिमाचल प्रदेशात २० जून रोजी मान्सून दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यांत ढगफुटी, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ जण बेपत्ता आहेत. या कालावधीत अतिवृष्टीमुळे राज्यात पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.अतिवृष्टीमुळे झालेल्या १४ जणांचा मृत्यू ढगफुटीमुळे, आठ जणांचा अचानक आलेल्या पुरामुळे, तर एकाचा भूस्खलनामुळे झाला, तर सात जण वाहून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा मंडी जिल्ह्याला बसला असून, मंगळवारी ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाच्या १० घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला.

केवळ मंडी जिल्ह्यात ३१ लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी शुक्रवारी भराड, देजी, पायला आणि रुकचुई या गावांत अडकलेल्या ६५ जणांची सुटका करून सुरक्षितस्थळी हलवले.अतिवृष्टीमुळे भूस्खलन, रस्ते वाहून जाणे आणि नद्यांना आलेले पूर यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहून आलेला राडारोडा लोकांची घरे तसेच शेतांमध्ये साचला आहे. राज्यात १५० घरे, १०६ गोठे, ३१ वाहने, १४ पूल आणि अनेक रस्त्यांची हानी झाली असून, १६४ गुरे वाहून गेली आहेत. सुटका केलेल्या ४०२ जणांसाठी पाच मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. यातील ३४८ जण एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील २८० रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कामकाज केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहे. यातील १५९ मंडी, ४९ सिरमौर आणि ३६ कुलू जिल्ह्यातील आहेत.राज्यात आज शनिवारपासून ते मंगळवारपर्यंतच्या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अॅलर्ट’ स्थानिक हवामान विभागाने जारी केला आहे.उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी वाढलेल्या भीमताल तलावात हवाई दलाचे दोन जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. प्रिन्स यादव (२२, पठाणकोट, पंजाब) आणि साहिल कुमार (२३, मुझफ्फरपूर, बिहार) अशी त्यांची नावे आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.