पुण्यातील डिलिवरी बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला तरुणीचा मित्र.

आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या घटनेने पुणे हादरलं. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथकं शोध घेत होती. अखेर या प्रकरणातील आरोपी पोलिसांना सापडल्याची माहिती समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातूनच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.

ही तरूणी घरी एकटी असल्याची संधी साधत कुरिअर देण्याच्या बहाण्याने आरोपीने घरात प्रवेश केला आणि पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने  पुन्हा एकदा पुणे शहरात महिला-मुली खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता. पोलिसांची दहा पथकं त्याच्या मागावर होती. अखेर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार 28 ते 30 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत कामाला आहे.

ती दोन वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपीने दरवाजा वाजवला. तेव्हा त्याने कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं. तरुणीने कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे सांगितले आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी घरात शिरला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे फोटो काढले. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ 5चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.