पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! खडकवासला प्रकल्पात ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा, अन्य धरणेही जून महिन्यातच फुल्ल.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत आजमितीला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणे शहराची सहा महिन्यांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांमध्ये १७.३७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ ‘टीएमसी’ पाणीसाठा अधिक जमा झाल्याची जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात चार मिलिमीटर, पानशेतमध्ये २९ मिमी, वरसगावमध्ये २७ आणि टेमघरमध्ये ४३ मिमी पाऊस झाला आहे. काही दिवसांपूर्वी धरणासह घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला प्रकल्पातून विसर्ग करण्यास सुरुवात केली होती. आता हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. जून महिन्यापासून झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ३.७७ टीएमसी पाणी धरणातून सोडले आहे.

खडकवासला प्रकल्पात १७.३७ टीएमसी (५९.५८ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४.८५ टीएमसी (१६.६२टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टीएमसी पाणी अतिरिक्त जमा झाले आहे.पुणे जिल्ह्यातील कळमोडी आणि नाझरे धरण जून महिन्यातच शंभर टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील उर्वरित धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड, येडगाव धरणात ७२ टक्क्यांपेक्षा अधिक साठा जमा झाला आहे. ‘टाटां’च्या विविध धरणांत ६३.८६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पवनामध्ये ६९ टक्के आणि भामा आसखेडमध्ये ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.