भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या छतावर ‘डॉक्टरी मलमपट्टी’; ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळतीनं उघड केली यंत्रणेची गळती!

भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या छतावर ‘डॉक्टरी मलमपट्टी’; ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळतीनं उघड केली यंत्रणेची गळती!भडगाव : “जिथं जीव वाचवले जातात, तिथंच आज जीव धोक्यात आहे!” – अशी परिस्थिती भडगाव ग्रामीण रुग्णालयाची सध्या झाली आहे. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण असलेलं हे रुग्णालय सध्या स्वतःच गंभीर ‘आजारी’ पडल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे.ऑपरेशन थिएटरच्या छतामधून सातत्याने पाणी गळत आहे आणि ते थेट ऑपरेशन थिएटरमध्ये पडत आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

फक्त ऑपरेशन थिएटरच नाही, तर संपूर्ण रुग्णालयच पाणीगळी, भिंतींच्या ओलसरपणामुळे खराब झालेली अवस्था, शौचालयांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा अभाव यामध्ये अडकलेलं आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अक्षरशः फरपट सुरू आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी तक्रारी केल्या आहेत.

मात्र, त्यांच्या निदर्शनास आलेली ही गंभीर समस्या ‘तात्पुरत्या मलमपट्टी’वर सोडवण्यात आली – छतावर केवळ कागद लावून पाणी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे!आज या रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेबद्दल भडगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘आमचं आरोग्य रामभरोशे!’ अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगू लागली आहे.आता प्रश्न असा आहे – रुग्णालयात रुग्ण सुरक्षित असतील का? की यंत्रणांमध्येच उपचारांची गरज निर्माण झाली आहे?

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.