एटीएमचा चुकीचा पिन दिल्याने थेट ट्रकचालकाला संपवलं; CCTVमुळे अडकले मारेकरी, नाशकात खळबळ.

चामरलेणी परिसरात बेवारस स्थितीत मृतावस्थेत आढळलेला तरुण कर्नाटकचा रहिवाशी असून, त्याच्या खूनप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे.जबरी चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांनी बेदम मारहाण करूनही ट्रकचालकाने एटीएमचा पिन दिला नाही म्हणून त्याचा निर्दयपणे खून करण्यात आला. या घटनेची उकल गुन्हे शाखा युनीट-१ च्या पथकाने केली.चामरलेणी परिसरात बेवारस स्थितीत मृतावस्थेत आढळलेला तरुण कर्नाटकचा रहिवाशी असून, त्याच्या खूनप्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एकावर दिंडोरीत हाणामारीचा, तर अन्य एकावर नाशिक तालुका आणि सातपूर पोलिस ठाण्यामध्ये एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

उमेश नागप्पा आंबिगार (वय ३४, रा. मरकुंडा गाव, ता. बिदर, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ट्रकचालक होता. विजय मधुकर खराटे (वय २०, रा. वडनगर, म्हसरूळ), संतोष सुरेश गुंबाडे (वय २६, रा. गणेश चौक, म्हसरूळ), अविनाश नामनाथ कापसे (वय २०, रा. मखमलाबाद), रवि सोमनाथ शेवरे (वय २८, रा. मानोरी गाव, ता. दिंडोरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. २२ जून रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास चामरलेणीच्या पायथ्याशी बेवारस मृतदेह आढळला होता.तोंडावर, डोक्यावर वार करून त्याला ठार मारण्यात आले. मृतदेह मिळून आला त्या भागात आलेल्या काही संशयित वाहनांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे माग काढून त्याआधारे एक मोटारसायकल निष्पन्न करण्यात आली.

संशयित म्हसरूळ, बोरगड परिसरात राहात असल्याची पोलिसांची खात्री पटली. गुन्हे शाखेच्या पथकाने चारही संशयितांना म्हसरूळ परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, संदीप भांड, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, महेश साळुंके, राहुल पालखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.शेवरे याच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले होते. आंबिगार हा आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ ट्रकमध्ये झोपल्याचे शेवरे याने पाहिले. त्याच्याकडून भरपूर पैसे मिळू शकतात असे सांगत साथीदारांना ट्रकजवळ बोलावून घेत आंबिगारला मारहाण करून त्याच्याकडील एटीएम कार्ड काढून घेतले. त्याला मोटारसायकलवर बसवून एटीएम सेंटरवर घेऊन गेले. तेथे चुकीच्या पिन क्रमांकांमुळे पैसे निघाले नाहीत. यामुळे संताप अनावर झाल्याने संशयितांनी त्याला चामरलेणीच्या पायथ्याशी नेत मारहाण करून त्याचा खून केला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.