वरळी डोम हाऊसफुल्ल, कार्यकर्त्यांची रेटारेटी, ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी समर्थकांचा गेट तोडून प्रवेश.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंना याचि देहि याचि डोळा एकत्र पाहण्यासाठी समर्थक उत्सुक आहेतहिंदीसक्तीच्या विरोधातील निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरेसेना यांच्याकडून वरळीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वरळी डोम परिसरात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली. पोलिस प्रशासनाने गेटवर कार्यकर्त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीच्या रेट्यापुढे पोलीस यंत्रणेचाही नाईलाज झाला. अखेर एका क्षणी कार्यकर्त्यांनी गेट तोडून वरळी डोममध्ये प्रवेश केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाकरे बंधूंना याचि देहि याचि डोळा एकत्र पाहण्यासाठी समर्थक उत्सुक आहेत. मेळाव्यासाठी अकरा वाजताची वेळ ठरली असली, तरी पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागातून मनसे आणि ठाकरेसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने जमा झाले.विशेष म्हणजे गर्दीचा फटका दोन्ही पक्षाच्या बड्या नेत्यांनाही बसला. मनसे नेते प्रकाश महाजन, ठाकरेसेना नेता अजय चौधरी हेसुद्धा गर्दीत अडकले होते. अखेर पोलिसांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढत प्रवेश दिला. आठ हजार प्रेक्षक क्षमता असलेलं वरळी डोम गर्दीने खचाखच भरुन गेलं आहे.

दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच अभिनेत्री तेजस्विनी पंडित, चिन्मयी सुमीत, अभिनेता सिद्धार्थ जाधव, भरत जाधव उपस्थित होते. तर मनसे नेते संदीप देशपांडे, राजू पाटील, प्रकाश महाजन, ठाकरे गटाकडून संजय राऊत, किशोरी पेडणेकर, अजय चौधरी उपस्थित आहेत.दरम्यान, या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू कार्यकर्त्यांना काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या आदेशापूर्वीच अनेक कार्यकर्ते, संस्थांनी बॅनरबाजी केल्याचे दिसत आहे. ‘ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!’ आणि ‘ब्रँड मराठीचा’ असा मजकूर असलेले बॅनरही वरळी परिसरात झळकल्याचे पाहायला मिळत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.