“आमचं आयुष्य वाढणार”; माऊलीच्या डोळ्यात पाणी तरळलं, सरकारी मदत हवेतच राहिली, पण ‘त्यांनी’ बैलजोडी मिळवून दिली.

‘क्रांतिकारी’च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली.लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याची कहाणी समोर आली आहे. अंबादास गोविंद पवार (वय ७५) नावाचे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे बैल नसल्यामुळे ते स्वतःच नांगर ओढत होते. या कामात त्यांची पत्नीही त्यांना मदत करत होती. ही बातमी समजल्यावर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेने त्यांना मदत केली. संघटनेने १ लाख रुपये जमा करून त्यांना बैलजोडी दिली.अंबादास पवार हे अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडे २ एकर ९ गुंठे शेती आहे. बैल नसल्यामुळे ते स्वतःच औताला जुंपून शेती करत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकजण मदतीसाठी पुढे आले.

पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. कृषीमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही.क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी लातूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बैलजोडीसाठी पैसे जमा करायला सांगितले. चार दिवसांत १ लाख रुपये जमा झाले. मग कार्यकर्त्यांनी वाजतगाजत बैलजोडी अंबादास पवार यांच्या घरी नेऊन दिली. कार्यकर्त्यांनी बैलांना औताला जुंपून शेती करायलाही मदत केली. तुपकर म्हणाले, “शेतकऱ्याची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला.”‘क्रांतिकारी’च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले साह्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. हा भावनिक क्षण होता. यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोन वरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली.

‘मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील जू उतरेल. पण ते तुम्ही उतरविले. तुमचे उपकार आहेत. तुमचा मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले.’ या शब्दांत रविकांत तुपकर यांचे आभार मानले.”राज्यातील कोण्याही शेतकऱ्यास अडचण असेल तर संघटना धावून जाईल. सरकारने घोषणा केल्या. मात्र ते मदत करू शकले नाही. अभिनेता सोनू सूद यांनीही मदतीची घोषणा केली आहे. शेतकरी जगला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत. तुम्ही धन्यवाद मानू नका. आमचे कर्तव्य आहे. कुठलीही अडचण आल्यास संपर्क करा. तुम्ही एकटे नाहीत. मी कायम तुमच्या पाठीशी आहे” असे अभिवचन रविकांत तुपकर यांनी आभार मानणाऱ्या पवार दाम्पत्याला दिले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.