“…नाहीतर माझ्या पद्धतीने तुमच्याकडे बघतो” बखोटीला धरलं न् गाडीवर बसवत भरदिवसा शिक्षकाचं अपहरण केलं, पुण्यात खळबळ.

आरोपींनी फिर्यादीस, “गुरूजी, तुम्हाला एक लाख रूपये द्यायला जमतात की नाही? असे म्हणत, एक लोखंडी मूठ असलेले लोखंडी फायटर काढुन फिर्यादीस दाखवले. व कायमचं संपवून टाकीन” अशी धमकी दिली इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील गुरूकुल गोखळी शिक्षण संस्थेचे संस्थापक लक्ष्मण हरणावळ यांचे अपहरण करून दर महिन्याला एक लाख रुपये खंडणी मागणाऱ्या तिघा जणांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे.शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे, संकेत आप्पा जळक (सर्व रा. तरंगवाडी ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण हरणावळ यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लक्ष्मण साहेबराव हरणावळ (रा. गोखळी तालुका इंदापूर ) हे गुरुकुल गोखळी शिक्षण संस्थेचे संस्थापक असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. ३ जुलै रोजी फिर्यादी हे केस कापण्यासाठी जात असताना यातील आरोपींनी हरणावळ यांना अडवून तुम्ही महिन्याला एक लाख रूपये द्या, नाहीतर मी माझ्या पध्दतीने तुमच्याकडे बघुन घेतो अशी धमकी दिली.त्यानंतर ३ जुलै रोजी सकाळी तंरगवाडी येथील गणेश क्षीरसागर याच्या कटींगच्या दुकानात फिर्यादी हे कंटीग करीत होते. यातील सर्व आरोपींनी फिर्यादीस, “गुरूजी, तुम्हाला एक लाख रूपये द्यायला जमतात की नाही? असे म्हणत, एक लोखंडी मूठ असलेले लोखंडी फायटर काढुन फिर्यादीस दाखवले.

व कायमचं संपवून टाकीन” अशी धमकी दिली व फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केली. नंतर जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवुन दीड किलोमीटर अंतरावर प्रल्हाद देवकाते यांच्या खडी क्रेशरवर घेऊन जाऊन फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील पाच हजार रुपये काढुन घेतले.शिवम बाळू डोंबाळे, वैभव हरिभाऊ माळवे, संकेत आप्पा जळक यांनी फिर्यादीस तुम्ही महिना एक लाख रूपये द्या, नाहीतर या फायटरने तुमचे हातपाय तोडू असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांकडून काही तासातच सर्व आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.