पार्टीच्या नावाने बोलावून तरुणाला संपवलं, चार दिवसांनी बॉडी भयंकर अवस्थेत; टॅटूने पटली ओळख.

धुळे जिल्ह्यात एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यक्तीला गोळ्या झाडून मारण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. मारेकऱ्यांमध्ये गावच्या सरपंच पुत्राचा समावेश असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम अद्याप सुरू झालेला नाही, मात्र गावागावात आतापासूनच सूडाच्या राजकारणाने टोक गाठलं आहे. यातून मोरदड गावातील एका तरुणाचा दुर्दैवी बळी गेला आहे.

या तरुणाला गोड बोलून कन्नड परिसरात नेण्यात आलं. तेथे बेसावध असतानाच त्याची गोळ्या झाडून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या तो जागीच गतप्राण झाला. गंभीर बाब म्हणजे मारेकऱ्यांमध्ये मोरदड गावच्या सरपंच पुत्राचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना जेरबंद केलं असून सद्यःस्थितीत मोरदड गावात तणावपूर्ण वातावरणासह भयाण शांतता पसरली आहे..जगदीश झुलाल ठाकरे (४२) रा. मोरदड असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. गेल्या रविवारपासून जगदिश बेपत्ता होता. त्यामुळे धुळे तालुका पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, काल गुरुवारी अचानक सोशल मीडियावर जगदिशच्या बॉडीचे फोटो आल्याने साऱ्यांनाच धक्का बसला.जगदीश ठाकरे याची गावातील काही तरुणांसोबत उठबस वाढलेली होती. रविवारी सायंकाळी त्याला शिरुड फाटा येथून काहींनी पार्टीच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं. सदर कार ही कन्नडच्या दिशेने रवाना झाली होती. रस्त्यात अशोक उर्फ भावडू मराठे रा. मोरदड, शुभम सावंत (मराठे), मोरदड ह. मु. पुणे, विक्की ठाकूर रा. चाळीसगाव यांनी कन्नड जवळ ओली पार्टी केली. नेमकी हीच संधी साधून जगदीशवर गोळ्या झाडण्यात आल्या. एक गोळी थेट डोक्यात घुसल्याने जगदिशचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती चाळीसगाव पोलिसांना मिळाल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चाळीसगाव रुग्णालयात नेण्यात आला. तत्पूर्वी, चाळीसगाव पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधला. जगदिशच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी चाळीसगाव पोलिसांसह धुळे तालुका पोलिसांनी याप्रकरणात मदत केली.याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं असून या यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे त्यालाही तातडीने अटक करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने जनआंदोलन काढण्याचा इशाराही यावेळी पदाधिकारी आणि नातेवाईकांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.