कोंढव्याची ‘पीडिता’ आरोपीचा फोटो पाहून दोन मिनिटं स्तब्ध, पोलिसांनाच ‘तो’ प्रश्न विचारला अन् गेम फिरला.

घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नाही. याशिवाय, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला.कोंढव्यातील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ‘सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, तपास सुरू आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नाही. याशिवाय, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच लिहिल्याचे कबुली दिली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. तो गेल्या वर्षभरापासून पीडितेच्या संपर्कात होता. दोघांची ओळख समाज मेळाव्यात झाली होती. त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता. तो तिच्या घरी येत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. इतकेच नव्हे; तर तो अनेकदा तिच्या घरी ‘फूड डिलिव्हरी अ‍ॅप’वरून पदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत येताना आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांनी त्याचा फोटो दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. मात्र, ती काही वेळ स्तब्ध झाली. ‘तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला?’ असा प्रश्नही तिने पोलिसांना विचारला. ओळखत नाही, हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासात स्पष्ट झाले, की आरोपी तरुण तिच्याच बोलावण्यावरून घरी आला होता.तरुणाचा फोटो कोंढव्याच्या सोसायटीतील इतर 44 रहिवाशांना दाखवण्यात आला. कोणीही त्या दिवशी या तरुणाला भेटले नाही, असे रहिवाशांनी जबाबात सांगितले. यावरून तो तरुणीच्या घरीच आल्याचे निश्चित झाले.कुरिअर बॉय, स्प्रे, सेल्फी आणि मेसेज या सर्व गोष्टी खोट्या असल्या, तरीही तरुणाने अतिप्रसंग केल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणाचा तपास सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.