लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यामुळे या प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना झटका दिला आहे. खंडपीठात दाखल याचिकेवर सोमनाथ यांच्या कुटुबीयांकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तीवाद केला होता. या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने पोलिसी कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाने न्यायासाठी आक्रोश करताना शासकीय मदत सुद्धा नाकारली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते. त्यामुळे या प्रकरणाची देशपातळीवर चर्चा झाली.










