भाजीत मीठ कमी पडल्यानं पत्नीला मारहाण, गच्चीवर नेलं अन् राक्षस पतीने गर्भवतीला संपवलं.

जेवणात मीठ कमी असल्यामुळे रागाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. इतकंच नाही तर, त्याने तिला गच्चीवरुन खाली फेकले.भाजीमध्ये मीठ कमी झाल्याने एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. आरोपी पतीने आधी पत्नीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्यानंतर तिला गच्चीवरून खाली फेकून दिले. या घटनेत गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला, तसेच तिच्या गर्भातील ५ महिन्यांच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना ढोलना पोलीस स्टेशन हद्दीतील ढक गावात घडली.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रामशरण नावाच्या व्यक्तीने जेवणात मीठ कमी आहे या कारणावरून पत्नी ब्रजमालाची हत्या केल्याचा आरोप आहे. बुधवारी (2 जुलै) रामशरण आणि ब्रजमाला यांच्यात जेवणातील मीठावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रामशरणने जेवणाची थाळी उचलून फेकली. तो म्हणाला की, जेवणात मीठ कमी का आहे आणि त्यानंतर त्याने पत्नीसोबत मारहाण केली. त्यानंतर तो तिला घराच्या गच्चीवर घेऊन गेला आणि तिथून तिला खाली फेकले. ब्रजमाला पाच महिन्यांची गर्भवती होती आणि मारहाणीमुळे तसेच गच्चीवरून खाली फेकल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.तिच्या किंकाळ्या ऐकून सासू घटनास्थळी पोहोचली आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान ब्रजमालाचा मृत्यू झाला.ब्रजमालाच्या चुलत भावाने सांगितले की, ती खूप सरळ स्वभावाची होती. रामशरण नेहमी तिच्यासोबत मारहाण करत असे. लग्नानंतर तो तिला लहान-लहान गोष्टींवरून मारत असे. या वेळीसुद्धा त्याने भाजीमध्ये मीठ कमी असल्यावरून वाद घातला आणि तिला जबर मारहाण केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पुढे ब्रजमालाच्या भावाने सांगितले की, त्यांनी रामशरणला अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीही ऐकले नाही. त्याने ब्रजमालासोबत तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाचासुद्धा जीव घेतला.कासगंजच्या ढोलना पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ब्रजमाला आणि रामशरण यांचा विवाह 7 वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यांना 3 वर्षांचा मुलगा देखील आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी रामशरण गावातून पळून गेला होता. गावकऱ्यांनी त्याला शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी रामशरणला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांनी आरोपी रामशरणला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.