संतापजनक प्रकार! मुलीची छेड काढली; वडिलांनी विरोध करताच बेदम मारहाण, जालन्यातील धक्कादायक घटना.

जालन्यात एका व्यक्तीने आपल्या मुलीची छेडछाड थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याला भयंकर मारहाण झाली. निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडलीये. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये हा प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हादरून टाकणारी ही घटना आहे. चक्क मुलीची छेडछाड होत असताना वडील आतमध्ये पडल्याने दोन जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडालीये.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला होता. त्याचा राग मनात ठेवत दोन आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. हा प्रकार जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी परिसरात आज घडला. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. चक्क घरासमोर वडिलांना मारहाण करण्यात आली. मुलीने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हेच नाही तर ज्यावेळी मारहाणीनंतर पीडित व्यक्ती घराकडे धावून येत असताना आरोपी घराच्या आतमध्येही मारण्यासाठी धावून आला. या घटनेनंतर पोलिसांचा आरोपींवर काही वचक आहे की, नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.पीडित व्यक्तीला ज्यावेळी मारहाण होताना दिसत आहे, त्यावेळी आजुबाजूला काही महिला देखील उभ्या असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यावेळी महिलांनी पीडित व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केला. मात्र, आरोपी महिलांच्या अंगावर देखील धावून जाताना दिसत आहेत. आरोपींनी तोंडाला रूमाल बांधला आहे. याप्रकरणात पोलिसांनी संशयित दोन जणांना अटकही केली असून त्यांची चाैकशी केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.