‘काश्मीरचा शेतकरी अचलपूरमध्ये पीक विम्याचा लाभ घेतो’; सुरेश अण्णा कराड आणि मुंडेंचं नाव घेत म्हणाले…

 भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानमंडळात बोगस पीक विमा योजनेचा मुद्दा उचलला. यावेळी बोलताना धस यांनी थेट वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.विधीमंडळामध्ये बोगस पीक विमा योजनेचा मुद्दा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मांडला होता. पीक विम्यामध्ये कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धस यांनी केला होता, मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये चौकशी थांबल्यानंतर यावर पुन्हा आपण या मुद्द्यावर विधीमंडळात बोलणार आहोत. त्यासोबतच परळीमधील जे बोगस शेतकरी आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जावेत अशी मागणी धस यांनी केली आहे. सुरेश धस नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.नांदेडमधील एफआयआर आता झालेला आहे, याआधी एक एफआयआर धाराशिवमध्ये झाला आहे. यामध्ये जवळपास ५६५ बोगस शेतकरी तो विमा शासकीय जमिनीवर टाकण्यात आलेला आहे. ती चौकशी थांबवण्यात आली म्हणजे थांबले. जे २३ ऑनलाइन करण्याचे सेंटर आहेत त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जे बोगस शेतकरी आहेत ते परळी तालुक्यातील आहेत म्हणजे तत्कालीन कृषीमंत्री यांच्या मतदारसंघातील लोक आहे. युपीचे लोक इथे येऊन विमा भरतात पण या पीक विम्यामध्ये परभणी, हिंगोली जिल्ह्यामधील जमीनीवर ठराविक लोकांनीच विमा भरला आहे.

बीडमधील फक्त परळी मतदारसंघातील मोजकी लोकं आहेत. पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलीस बोलतात की अजून हा भ्रष्टाचार झालेला नाही त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही. या रकमा कमी नाहीत, ३ कोटी सरकारचा प्रीमीयम आणि त्यातून मिळणारी रक्कम १५ कोटी म्हणजे १८ कोटी रूपये धाराशिव जिल्ह्यातील त्या ५६५ शेतकऱ्यांच्या नावावर जाणार होते. असंच इतर जिल्ह्यातील आहे. पीक विम्याच्या भरपाईबाबतीत २०१५ पासून आतापर्यंत यातील विशेष घोटाळा एक रूपयात पीक विमा योजना लागू झाली तेव्हा सर्वात जास्त घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी केला आहे.

फक्त सेंटरवर गुन्हा दाखल करून चालणार नाही ज्या बोगस शेतकऱ्यांनी सरकारी पीक विमा भरला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र चौकशीची करण्याची विनंती करणार आहे. दोन जिल्ह्यात एफआयर झालेत असे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व्हावेत, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.दरम्यान, बच्चू कडू यांचा आरोप आहे की, काश्मीरमधील शेतकरी अचलपूरमध्ये पीक विम्याचा लाभ घेत आहेत, यावर सुरेश धस यांनी बोलताना, हे काश्मीरमधून लोकं आणू शकतात. तत्कालीन कृषी मंत्री आणि जेलमध्ये गेलेले आका आहेत ते कुठूनही लोकं आणू शकतात असं म्हटलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.