मराठीचा मुद्दा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय; रामदास कदम यांच्या शिलेदाराने सुनावले खडेबोल.

माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे. त्यांच्या मते, आता त्यांच्या पाठीशी कोणतीही ताकद शिल्लक नाही आणि ते मराठीचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी वापरत आहेत. पूर्वी एकत्र असलेले आता आयपीएलप्रमाणे झाले आहेत. पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत. मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय, अशी टीका संजय कदम यांनी केलीये. पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता आयपीएल झालंय. आता आम्ही सर्वजण विचाराने शिवसेनेसोबत आहोत, असेही त्यांनी म्हटले. उद्या ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येतील आणि ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीला मनसे आणि शिवसेनेने (उबाठा गट) विरोध केला.

सरकारने हिंदी सक्तीविरोधातील दोन्ही जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला.आता त्यामध्ये ठाकरे गटातून प्रवेश केलेले माजी आमदार संजय कदम यांनी मोठे भाष्य केले. दोन भाऊ एकत्र येतात त्यांना शुभेच्छा असे माजी आमदार संजय कदम यांनी म्हटले. गुहागर तालुक्यातील तळवली येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तरे दिली. ते पुढे असेही म्हणाले की, या दोन भावांच्या पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही, पाठीमागे काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे होतं पण ते आता नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत.मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय. वैभव खेडेकर यांनी जर पाच तारखेच निमंत्रण दिलं तर तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार का असे विचारल्यानंतर ते म्हणाले की, पूर्वी एकत्र कोण कोण होतं ते आता आयपीएल झालंय. आता आम्ही सर्वजण विचाराने शिवसेनेसोबत आहोत.

उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही आता एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता महायुतीमधील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशीच एक मोठी प्रतिक्रिया माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम त्यांचे पूर्वाश्रमीचे शिलेदार असलेले व काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार संजय कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.पाठीमागे काही ताकद शिल्लक नाही आणि आता ते मराठीचा मुद्दा घेऊन पुढे येत आहेत. मराठीचा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय, असेही त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू खरोखरच एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. विधानसभा निवडणुकीच्या अपयशानंतर आगामी महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढतील, अशी एक जोरदार चर्चा रंगताना दिसत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.