हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे सर्वत्र विध्वंस; ६९ जण दगावले, ४०० हून अधिक रस्ते बंद.

हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक प्रलयात गेल्या दोन आठवड्यात (२० जून ते ३ जुलै दरम्यान) किमान ६९ लोक दगावले आहेत. ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता धुळीस मिळाल्या आहेत.हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक प्रलयात गेल्या दोन आठवड्यात (२० जून ते ३ जुलै दरम्यान) किमान ६९ लोक दगावले आहेत. ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता धुळीस मिळाल्या आहेत. मंडी जिल्ह्यात १६ ठिकाणी ढगफुटी झाली आहे, तर ३ वेळा पूर आला आहे. परिणामी अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. तर गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.हवामान विभागाने७ जुलैपर्यंत हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुन्हा भूस्खलन होण्याची शक्यता बळावली आहे. राज्यात ४०० रस्ते बंद आहेत, ५०० पेक्षा जास्त वीज रोहित्रबंद पडले आहेत. जवळपास ७०० पिण्याच्या पाण्याच्या योजना विस्कळीत झाल्या आहेत. यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान बदलामुळे हे संकट ओढवले आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.सध्या बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, होमगार्ड, लष्कर स्थानिक पोलीस आणि इतर केंद्रीय संस्था सर्व प्रयत्न पणाला लावून मदत करत आहेत. एका स्थानिक व्यक्तीने सांगितले, ‘ढगफुटीमुळे सगळं काही वाहून गेलं आहे.’पाऊस आणि पुरामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. सरकार आणि बचाव पथके लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांना सुरक्षित राहण्याचा आणि हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे खबरदारी बाळगण्याच सल्ला देण्यात आला आहे. जर कोणी अडचणीत असेल, तर त्याला मदत करा. लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे  सचिव डी. सी. राणा यांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, ‘संपूर्ण नुकसानीचा आकडा ४०० कोटींच्या आसपास आहे. पण प्रत्यक्षात हे नुकसान खूप जास्त असू शकतं. सध्या आमचं लक्ष लोकांना शोध घेण्यावर आणि मदत करण्यावर आहे. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी वेळ लागणार आहे.’राणांनी पुढे नमूद केले की म्हणाले, ‘वरिष्ठ सरकारी इंजिनियर आणि अधिकारी मंडीमध्ये आहेत. कारण तिथे प्रचंड नुकसान झाले आहे. वीज, पाणी आणि रस्ते पूर्ववत करणे हे आमचं पहिले प्राधान्य असणार आहे.’
अधिकाऱ्यांनी असेही अधोरेखित केले की, हवामान बदलामुळे हिमाचल प्रदेशच्या पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. ‘हे सगळे जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचे परिणाम आहेत. याचा फटका हिमाचललाही बसत आहे.’ असे राणा म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.