मविप्र शिक्षणाधिकाऱ्यांना हातपाय तोडण्याची धमकी; टेंडर न दिल्याने मागितली 5 लाखांची खंडणी, नाशिकमधील प्रकार.

मविप्र ही नाशिकमधीलच नाही, तर राज्यातील मोठी शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेचा जिल्हाभर मोठा व्याप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदीचे, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या बांधकामांचे टेंडर निघत असतात. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था टेंडर देत नाही म्हणून ‘मविप्रचे रामराज्य’ या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर संस्थेची व पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. मविप्रच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पुन्हा संस्थेत फिरकू न देण्याचीही धमकी संशयित सुदर्शन सारडा याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.संस्थेने टेंडर न दिल्यास दरवर्षी पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याने सुदर्शन दिलीप सारडा या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मविप्रचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भास्कर सुकदेव ढोके (वय ५६, रा. खुटवडनगर) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मार्च २०२३ पासून आतापर्यंत हा प्रकार सुरू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. मविप्र ही नाशिकमधीलच नाही, तर राज्यातील मोठी शैक्षणिक संस्था आहे.

या संस्थेचा जिल्हाभर मोठा व्याप आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदीचे, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या बांधकामांचे टेंडर निघत असतात.हे टेंडर आपल्याला किंवा आपण सांगू त्यांना न दिल्यास संस्थेची, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करू, अशी धमकी सारडाकडून दिली जात होती. परंतु, त्याच्या धमक्यांना संस्थेने जुमानले नाही. त्यामुळे त्याने संस्थेचे नामसाधर्म्य असलेले ‘मविप्रचे रामराज्य’ या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर ढोके यांच्यासह संस्थेची आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. टेंडर न दिल्यास दरवर्षी पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. जूनअखेरपर्यंत मागणीची पूर्तता न केल्यास त्याच्याकडील संस्थेच्या कागदपत्रांचा वापर करून संस्थेचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी त्याने दिली होती.

तुमच्या हॉस्पिटलविरोधात अनेक तक्रारी असल्याने ते बंद करू, अशी धमकी देऊन हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संशयिताला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. अंजूम मकराणी असे संशयिताचे नाव असून, त्याच्यावर सन २००० पासून भद्रकाली पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणीप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. डॉ. देवेंद्र निवृत्ती खैरनार (वय ४२, रा. मनोहर गार्डनशेजारी, गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.वडाळारोडवर त्यांचे फोर्च्यून हॉस्पिटल आहे. २४ ते ३० जून या कालावधीत संशयित हॉस्पिटलमध्ये आला. तुमच्या हॉस्पिटलविरोधात अनेक तक्रारी असून, आम्हाला हॉस्पिटल बंद पाडावे लागेल, असे धमकावू लागला. हॉटेल सुरू ठेवायचे असेल, तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणी त्याने मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून मकराणी याला अटक केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.