दोन सेकंदात भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवलं, दोन जणांचा जागीच मृत्यू CCTV फुटेज समोर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला. काळा गणपती मंदिराजवळ भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या लोकांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. काळा गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. एका भरधाव कारने दर्शनासाठी आलेल्या ५-६ जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओ पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लोकांना बेधुंद कार चालकाने मृत्यूच्या दारात ढकललं.छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती मंदिराच्या परिसरात दुःखद घटना घडली.

एका वेगवान कारने निष्पाप नागरिकांना चिरडले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही लोकांना कारने धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन लोकांचा जागेवरच मृत्यू झाला. “मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोघांचा यात जागीच मृत्यू झाला,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतर ४ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघात नेमका कसा झाला हे दिसत आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या कोणी कल्पनाही केली नसेल असा काही अपघात घडेल. ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात येत होते. अचानक त्यांच्यासोबत हे घडलं, इतकंच नाहीतर गणपती मंदिराच्या पायऱ्यांवर एक महिला चप्पल स्टँडजवळ चप्पल काढत होती.

त्यावेळी पापणी लवत नाही तोवर कार तिच्या अंगावर चढली. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्या, अपघात झाला त्यावेळी तिथ उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा काळजाचा ठोका चुकला. कारण काही मिनिटांआधी ते लोकसुद्धा त्याच रस्त्यावरून आले होते. अपघातावेळी जे लोक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी यांचाही नंबर लागला असता. सुदैवाने जास्त लोक मृत्यूमुखी पडले नाहीत, पण दोन जणांना आपले प्राण गमवावे लागेल. कार चालक मद्यधुंद अवस्थेत चालवत होता का? ब्रेक ऐवजी त्याने ॲक्सिलरेटर दाबला गेला याचा तपास पोलीस करत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.