अमित शहा आज पुणे दौऱ्यावर; वाहतुकीत मोठे बदल, काही शाळांना सुट्टी, तर काहींच्या वेळेत बदल.

सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काहींनी आपल्या वेळेत बदल केला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, शुक्रवारी (चार जुलै) पुणे दौऱ्यावर येत असल्याने, त्यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे शहरातील काही रस्त्यांवर वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून, काही शाळांनी सुट्टी जाहीर केली आहे, तर काहींनी आपल्या वेळेत बदल केला आहे.मुलांच्या सुट्टीमुळे पालकांनाही आपल्या नियोजनात बदल करावा लागला आहे. त्याचप्रमाणे खासगी आस्थापना आणि कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो.गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शुक्रवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहे. या वेळी ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , कोंढवा बुद्रुक, खडी मशिन चौक आणि वडाची वाडी परिसराला भेट देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळितपणे सुरू राहण्यासाठी वाहतूक शाखेने बंडगार्डन, काळेपडळ, कोंढवा आणि भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत आज, शुक्रवारी वाहतुकीत तात्तुरत्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अंतर्गत आज दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत संबंधित विभागांमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केले आहेत.या बदलांचा फटका शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबस आणि व्हॅन यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत येता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन काही शाळांनी शाळेला सुट्टी देत, ऑनलाइन पद्धतीने वर्ग भरवणार असल्याचे जाहीर केले आहे. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांनी शाळेला दीड ते दोन तास लवकर सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन वेळी झालेल्या या बदलांमुळे पालकांनाही आपल्या नियोजनात बदल करावा लागला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (चार जुलै) शहर वाहतूक विभागाने कात्रज ते मंतरवाडी रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक आणि कात्रज चौक या दरम्यान मालवाहतूक करणारी वाहने, डंपर, मिक्सर, ट्रक, जड व अवजड वाहने; तसेच स्लो मुव्हिंग वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.याशिवाय, बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीत, मोर ओढा ते सर्किट हाउस चौक ते आयबी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस रस्त्यांवर तैनात राहणार आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.