महाजनांच्या खेळीचा ‘खंडोबा’! बागूल, राजवाडेंच्या प्रवेशास ब्रेक, राऊतांच्या पोस्टने फिरला ‘ड्रामा’.

बागूल, राजवाडेंच्या प्रवेश सोहळ्यापूर्वीच खासदार राऊत यांनी त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी करीत माजी उपमहापौर प्रथमेश गितेंची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. महापालिकेत ‘शंभर प्लस’चा नारा यशस्वी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुरू केलेल्या मोहिमेला महाजनांच्याच एका खेळीने ‘ब्रेक’ लागला आहे.पाच दिवसांपूर्वीच नेमलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदावर नियुक्त झालेल्या मामा राजवाडेंसह उपनेते सुनील बागूल यांच्या प्रवेशाचा भाजपने टाकलेला डाव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या एका ‘एक्स पोस्ट’ने तूर्त मोडला आहे. बागूल, राजवाडेंच्या प्रवेश सोहळ्यापूर्वीच खासदार राऊत यांनी त्या दोघांची पक्षातून हकालपट्टी करीत माजी उपमहापौर प्रथमेश गितेंची महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामुळे राजवाडे, बागूल यांच्या प्रवेशाच्या मोहिमेऐवजी महाजन यांना आता शुद्धीकरण मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

मुंबईत रंगलेल्या या ‘हायव्होल्टेज ड्रामा’ची नाशिकमध्ये गुरुवारी दिवसभर चर्चा रंगली होती.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला आहे. त्यामुळे स्वबळावर सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटातील वादग्रस्त माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही आपलेसे करून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक पश्चिममधील सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाचे नाट्य रंगल्यानंतर दुसरा अंक बुधवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस पाहायला मिळाला. भाजप गुरुवारी (दि. ३) ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत होता. बडगुजर यांच्यापाठोपाठ उपनेते सुनील बागूल आणि नूतन महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनाही भाजपने गळाला लावले होते. गुरुवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी बागूल, राजवाडे मुंबईत दाखलही झाले होते.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा अंकही सजला. परंतु, खासदार राऊत यांनी ‘एक्स पोस्ट’द्वारे भाजपची पोलखोल केली. राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवत राजकीय साधनशुचिता आणि पोलिस यंत्रणेच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला. फरारी आरोपींना भाजप प्रवेश देत असल्याची खरमरीत टीका राऊत यांनी या ‘पोस्ट’द्वारे केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ‘टॅग’ केले. फरारी आरोपींचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे मतदार आणि समाजात भाजपविषयी चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. या सगळ्याचा सारासार विचार करून भाजप नेतृत्वाने बागूल आणि राजवाडे यांचा पक्षप्रवेश तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला. हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ला चर्चेचा विषय ठरला.‘भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा, की हे सगळे फरार (भाजपसाठी गुन्हेगार) आज भाजपत प्रवेश करत आहेत! जमवाजमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!’

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.