दोघांच्याही पदरात तीन मुलं, तरी ‘लग्नानंतर झालंच प्रेम’; विवाहित प्रेमीयुगलाने आयुष्य संपवलं, महाराष्ट्र हादरला.

घरापासून काही अंतरावर राहत असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. जिल्ह्यात परधाडे (ता. पाचोरा) येथे एका विवाहित प्रेमी युगलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार, दि. 3 जुलै रोजी सकाळी समोर आली. योगेश रामदास ठाकरे, वय 35 वर्ष आणि मीना बबलू ठाकरे, वय 28 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.परधाडे (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेल्या योगेश आणि मीना यांचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते.

विशेष म्हणजे, योगेशला त्याच्या पत्नीपासून तीन मुले आहेत, तर मीनालाही तिच्या पतीपासून तीन मुले आहेत. घरापासून काही अंतरावर राहत असल्याने दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले.या अनैतिक संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांना मिळाल्यानंतर विरोध झाल्याने योगेश ठाकरे तीन महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यातील त्याच्या बहिणीच्या गावी राहत होता. तीन दिवसांपूर्वीच तो परधाडे येथे परतला होता. बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास योगेश आणि मीना घरातून एकत्र पळून गेले. त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला. परंतु, गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास रेल्वेच्या डाऊन साईडवरील पोल क्रमांक 384/25 जवळ त्यांचे मृतदेह आढळून आले.दुसरीकडे, सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील पारोळा वनविभागाचे दोन वनपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडले. दिलीप भाईदास पाटील (वय 52, रा. देवपूर, धुळे) आणि वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय 38, रा. चोरवड, ता. पारोळा) अशी लाचखोर वनपालांची नावे आहेत.या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. एका व्यापाऱ्याने इंधवे शिवारातील एका शेतकऱ्याकडून 60 हजार रुपयांचे सागवान लाकूड खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. यासाठी वन विभागाकडून आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी रीतसर अर्ज केला होता. याच परवानगीसाठी संशयितांनी आठ हजारांची लाच मागितली होती.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.