मेहता बिहतांनी चड्डीत राहायचं, संदीप देशपांडेंचा इशारा, महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच…

मिरा-भाईंदरमध्ये एका मिठाई विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून रविवारी त्याला मारहाण करण्यात आली होती. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल, बाकी मेहता बिहतांनी चड्डीत राहायचं, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना डिवचलं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका मिठाई विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून रविवारी त्याला मारहाण करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर ‘मिरा-भाईंदर बंद’ची हाक देत गुरुवारी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यावरुनही मनसेने भाजपवर आरोप केले आहेत. ठाकरे बंधूंमधील वाढत्या जवळिकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपमधील दरी वाढताना दिसत आहे.”बेपारी आहात बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एव्हढाच” अशी पोस्ट संदीप देशपांडे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर केली आहे.दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये मिठाई विक्रेत्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांकडून त्याला मारहाण केली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला. काशिमिरा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी ‘मिरा-भाईंदर बंद’ची हाक देत मोर्चा काढला होता.दरम्यान, बुधवारी रात्री व्यापारी संघटना, पोलिस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर विषय न वाढवण्याच्या अनुषंगाने मोर्चा न काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यास व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही होकार दर्शवला होता. मात्र, त्यानंतरही भाजपच्या स्थानिक एजंटच्या सांगण्यावरून गुरुवारी मोर्चा काढण्यात आला, असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.आगामी काळात महापालिका निवडणुका होणार असल्याने भाजपकडून मोर्चा काढून राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले. भाजपला मराठी मतदारांची मते मिळाली आहेत, त्यामुळे हा प्रकार थांबवा, अन्यथा स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या घरावर मराठी बांधवांना घेऊन मोर्चा काढू, असा इशारा जाधव यांनी दिला.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.