पुन्हा एकदा भीषण विमान अपघात, हजारो फूट उंचीवर पंख तुटला; धावपट्टीवरून निघालेलं प्लेन जंगलात कोसळलं.

अहमदाबाद – लंडन विमान अपघातानंतर पुन्हा एकदा दोन विमान अपघात समोर आले आहेत. एका दुर्घटनेत विमानाचा पंख तुटला, तर दुसऱ्या अपघातात स्काईडायव्हिंग करताना एक विमान कोसळलं. जखमींवर उपचार सुरू आहेत.गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा दोन विमान दुर्घटना समोर आल्या आहेत. नॉर्थ कॅरोलिनामध्ये हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाचा पंख तुटून तो खाली रस्त्यावर पडला. मात्र यात मोठी दुर्घटना टळली. तर, दुसरीकडे न्यू जर्सीमध्ये स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरून जंगलात कोसळल्याची घटना घडली असून या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत.न्यू जर्सीमधील घटनेत, स्कायडायव्हिंग दरम्यान विमान कोसळल्याने १५ जण जखमी झाले. हे विमान क्रॉस कीज विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियापासून सुमारे ३३.८ किलोमीटर क्रॉस कीज विमानतळावर “सेसना 208 बी” विमान दुर्घटनाग्रस्त झालं.या विमानात १५ लोक होते. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्यू जर्सीमधील या विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.न्यू जर्सीमधील कॅम्डन येथील कूपर यूनिवर्सिटी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी या अपघातात जखमी झालेल्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तीन लोकांवर उपचार सुरू आहेत, तर इतर आठ लोकांवर आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक जखमींची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनाग्रस्त विमान जंगलात पडल्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.नॉर्थ कॅरोलिनामध्ये विमानाचा पंख तुटल्याची घटना आणि स्कायडायव्हिंग विमान कोसळल्याच्या दोन्ही घटनांची चौकशी सुरू आहे. विमानाचा पंख तुटून पडण्याचं कारण आणि स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरून जंगलात कसं कोसळलं, याचा तपास केला जात आहे.या दोन्ही घटनांमुळे अमेरिकेतील विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विमान कंपन्या आणि विमानतळ प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.