चार महिन्यांपूर्वीच दर्शनच्या आईचे दुसरे लग्न; सावत्र बापाने काढला मुलाचा काटा…अकोल्यातील खळबळजनक घटना.

अकोल्यातील अकोटमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची त्याच्या सावत्र बापाने हत्या केली. दर्शन पळसकार असे मुलाचे नाव आहे. आरोपी आकाश कान्हेकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले यांना अटक करण्यात आली आहे. मुलाच्या आईने चार महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते. संपत्तीच्या संशयातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडले. अधिक तपास सुरू आहे.अकोल्यातील अकोटमध्ये एका सावत्र बापाने आपल्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दर्शन वैभव पळसकार असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. दर्शनच्या आईने चार महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न केले होते. दर्शनला एक अकरा वर्षाची मोठी बहिण देखील आहे, सावत्र वडिलाने दर्शनची हत्या का केली याचं कारण अद्यापही समोर आलं नसून अकोट पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. हत्या केल्यानंतर आरोपीने दर्शनचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावत्र मुलगा भविष्यात संपत्तीत हिस्सा मागणार, या संशयातून सावत्र वडिलांनी त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

आकाश साहेबराव कान्हेरकर असं मारेकरी सावत्र वडिलांचे नाव आहे. याशिवाय गौरव वसंतराव गायगोले असं मारेकऱ्याला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहे. मुले देवा घरची फुल अशी म्हण आहे. मात्र, ही फक्त आई-वडील असतानाच खरी आहे, याची प्रचिती अकोल्याच्या अकोट येथील घटनेनंतर आली आहे. कारण सावत्र बापानेच नऊ वर्षाच्या चिमुकल्या दर्शनचा खून केल्याची घटना घडली आहे.दर्शन हा 02 जुलैला बेपत्ता झाला होता. दर्शनच्या आईने याबाबत अकोट पोलिसात तक्रार दाखल केली. बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच अकोट शहर आणि अकोट ग्रामीण पोलिसांनी बेपत्ता दर्शनला शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. रात्रभर गस्त घालून हाती काहीच सापडलं नसल्याने, सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर, अकोट ग्रामीण भागातील चिचोना शेतशिवारात दर्शनचा मृतदेह आढळला. चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या तपासात सावत्र वडिलांनीच खून केल्याचं समोर आलं आहे.दर्शन बेपत्ता झाल्यानंतर आईने टाहो फोडत पोलीस स्टेशनला धडक दिली. पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांआधी शहरात दिलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत पोलिसांना झाली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन व्यक्ती दर्शनला मोटरसायकलवर घेऊन जाताना दिसले, यातील एक व्यक्ती दर्शनच्या आईसोबत बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. पोलिसांनी बरोबर या व्यक्तीला ओळखून तपास चक्र फिरवली आणि दर्शनचा मारेकरी त्याचा सावत्र बापच असल्याचं समोर आलं. सावत्र बाप आकाश साहेबराव कान्हेरकर आणि त्याचा साथीदार गौरव वसंतराव गायगोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.