वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केलेलं, पण गतिमंद मुलीवर नराधमाने…

केजमध्ये एका गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. आरोपी नानासाहेब चौरेला अटक करण्यात आली असून, तो यापूर्वीही अनेक गुन्ह्यात सामील होता. पीडित तरुणी आरोग्य उपकेंद्राकडे जात असताना हि घटना घडली.केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाने एका गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना २ जून रोजी घडली. आरोपीचे नाव नानासाहेब भानुदास चौरे असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पीडित तरुणी २५ वर्षांची आहे. ती तिच्या भावजयीसोबत आरोग्य उपकेंद्रात जात होती. वाटेत त्या एका शेतातील गोठ्यात थांबल्या. भावजयी मुलाला डोस देण्यासाठी उपकेंद्रात गेली.

त्यावेळी चौरेने संधी साधून तरुणीवर अत्याचार केलाभावजय परत आल्यावर तिला हा प्रकार दिसला. तिने आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि आरोपीला पकडले. या बाबतची माहिती उपस्थितांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आरोपी नानासाहेब चौरे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. “त्याच्यावर लैंगिक अत्याचार, बालकांचे शोषण, ॲट्रॉसिटीसह, अवैध्य दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत,” असे पोलिसांनी सांगितले. तो एका लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. त्याच्याविरुद्ध आणखी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

हैराणीची बाब म्हणजे तो स्वतः दिव्यांग असून त्याने दिव्यांग मुलीवर अत्याचार केला. चौरे याने यापूर्वी वाल्मीक कराडच्या समर्थनासाठी आंदोलन केले होते. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कराड आरोपी आहे. कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी चौरे पाण्याच्या टाकीवर चढला होता.दुसरीकडे, नंदूरबारमधील शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालय तसेच परिसरात विद्यार्थिनीसोबत छेडछाडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या बाहेर गेल्या असता विद्यार्थिनींना अटीट्यूड दाखवू नको, असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा अश्लील शब्दाचा वापर करुन छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाने यावर कुठलीही पोलीस तक्रार करणार नसल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सुरक्षेच्या प्रश्न देखील पुन्हा एकदा समोर आलेला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.