दौंडमध्ये वारकऱ्यांना लुबाडलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाचा ‘चेहरा’ उघड.

वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत वारकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात घडला होता. या नराधमाने कोयत्याचा धाक दाखवून वारकऱ्यांना लुबाडले, तर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरुन आलेल्या दोघा आरोपींनी हा प्रकार केला होता. त्यापैकी एकाचं रेखाचित्र पुणे पोलिसांनी जारी केलं आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी दहा वेगवेगळी पथकं सुद्धा तैनात केली आहेत.
वारकऱ्यांनी भरलेला एक टेम्पो गेल्या सोमवारी मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हे वारकरी दौंडजवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. कोयत्याचा धाक दाखवत वारकरी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले.इतकंच नाही तर याच वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांनी आरडाओरडा केल्यावर आरोपी फरार झाले. पंढरपूरला निघालेल्या वारीमध्ये असा धक्कादायक प्रकार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

आता यात दोन आरोपींपैकी एकाचं रेखाचित्र पुणे पोलिसांनी जारी केलं आहे तर याबद्दल काही माहिती असल्यास पुणे पोलिसांची संपर्क साधावा, असं आवाहन सुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.हे दोन नराधम अजून फरार असून त्यांचा शोधासाठी पुणे पोलीस जंग जंग पछाडत आहेत.सोमवारी रात्री वारकऱ्यांची एक गाडी देवदर्शनसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली परिसरातील एका टपरीवर थांबले होते. वारकऱ्यांच्या या गाडीत महिला, पुरुष आणि अल्पवयीन तरुणी ही होती. याचवेळी दुचाकीवर दोघेजण आले. त्यांनी या सर्वांना कोयत्याचा धाक दाखवला. डोळ्यात मिरची पूड टाकली आणि महिलांच्या गळ्यातील दागिने ओढून घेतले.त्यानंतर या नराधमांची नजर अल्पवयीन तरुणीवर पडली, आरोपींनी तिलाही कोयत्याचा धाक दाखवत टपरीच्या पाठीमागे असणाऱ्या अंधाऱ्या भागात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर हे नराधम पसार झाले.या घटनेनंतर सर्व स्तरातून एकच संताप व्यक्त केला जात. मोठ्या भक्तीभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी दहा वेगवेगळी पथक तैनात केली आहेत.

त्यासोबतच या दोन आरोपींपैकी एकाच रेखाचित्र सुद्धा पुणे पोलिसांनी जारी केल आहे. त्यामुळे या नराधमांना कधी अटक होणार हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसल्याने दौंडचे डीवायएसपी बापूराव दडस यांना निलंबित करण्याची मागणी दौंडमधील आंबेडकरी समाजाने केलीय. दौंड तालुक्याची मान शर्मिने खाली गेली आहे. दौंड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. तसेच 48 तास उलटून गेले तरीही आरोपींना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच पुणे सोलापूर महामार्गावरील अवैध व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांकडून वसुली करण्यापेक्षा महामार्गावरील सुरक्षेकडे लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.