तापी आरती व पूजन सोहळा उत्साहात संपन्न.

भुसावळ शहरात आज सूर्यकन्या तापी माता जन्मोत्सव निमित्त आयोजित “तापी महाआरती व पूजन” कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने, कोणत्याही संस्थेचा, जातीचा, किंवा पक्षाचा झेंडा न लावता फक्त “संस्कृती हाच अजेंडा”}या भावनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध घटकांतील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक महाआरती केली.

तापी नदीच्या काठावर पार पडलेल्या या पूजनात महिलांचा व तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला. शंखध्वनी, पारंपरिक पद्धतीने आरती सादर करण्यात आली. अनेक श्रद्धाळूंनी दिवे प्रज्वलित करून तापी माता पूजनात सहभाग नोंदविला.या उपक्रमाचे सर्व समन्वयक मंगेश पि. भावे , राहुल संगीता रमेश सोनटक्के,  हरीश अनिल लोखंडे मंगला पाटील, प्रभावती पाटील, स्वाती भोळे, मेघा कुरकुरे, वैशाली चौधरी,विजया निकम यांनी सांगितले की, “तापी नदी केवळ पाण्याचा स्रोत नाही, ती आपली संस्कृती आहे. तिचा सन्मान आणि संवर्धन आपल्या कर्तव्याचा भाग आहे. तसेच सकल भुसावळ वासियांन तर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार असून तापी मातेची साप्ताहिक आरती करून नदी पात्र व परिसरातील साफ सफाईचे करण्याचा संकल्प आज सर्वांनी केला आहे. ” कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी  निलेश लाखोटे,  सुधीर मायकल, दीपक तिवारी, यश इंगळे, साई गोसावी व असे अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोलाचे योगदान लाभले. उपस्थितांनी भविष्यातही अशा अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सगळ्यांचा सहभाग असेल..!!

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.