मुंबईत प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं; कारण समोर.

 मुंबईत एका टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. कांदिवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.मुंबईमध्ये एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली परिसरात बुधवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 57 व्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात ही घटना घडली असून अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक येथे वास्तव्यास होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करते. अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र, त्याला क्लासला जायचे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला होता. याच संतापाच्या भरात मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली. 57 व्या मजल्यावरुन थेट खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करणारा मुलगा या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मुलाने उडी मारल्यानंतर मोठा आवाज झाला. आवाज ऐकून इमारतीमधील रहिवासी जमा झाले आणि त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, या मुलाने ट्युशनच्या वादातूनच टोकाचं पाऊल उचललं की यामागे इतरही कोणते कारण आहे, याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.दरम्यान, या घटनेमुळे अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. तसंच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.