शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालय तसेच परिसरात विद्यार्थिनीसोबत छेडछाडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या विद्यार्थिनींना अटीट्यूड दाखवू नको, असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा शब्दांचा वापर करुन छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालय तसेच परिसरात विद्यार्थिनीसोबत छेडछाडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या बाहेर गेल्या असता विद्यार्थिनींना अटीट्यूड दाखवू नको, असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल अशा अश्लील शब्दाचा वापर करुन छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाने यावर कुठलीही पोलीस तक्रार करणार नसल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयात विद्यार्थिनीचा सुरक्षेच्या प्रश्न देखील पुन्हा एकदा समोर आलेला आहे.
शहादा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात महाविद्यालयीन कामासाठी दोन विद्यार्थिनी आल्या होत्या. याचवेळी त्यांच्यासोबतच मागून दोन अज्ञात तरुण त्यांचा पाठलाग करत महाविद्यालया पर्यंत पोहचले. त्याठिकाणी एका बेंच वर त्या विद्यार्थिनी बसल्यानंतर ते दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हात लावला. हात लावल्यानंतर ते विद्यार्थिनी घाबरल्या व महाविद्यालयाच्या बाहेर पडल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे.विद्यार्थिनी महाविद्यालयाचा बाहेर येत मोटरसायकलवर बसले आणि बाहेर जायला निघाले त्यातच ते दोघेही अज्ञात तरुण त्यांचा पाठलाग करत एका सायबर सेंटरवर येऊन उभे राहिले. यावेळी विद्यार्थिनींना त्या दोघांनी सायबर चालू आहे का, असे विचारले. त्यावेळी आम्हाला माहित नाही. तुम्ही विचारून घ्या, असे उत्तर विद्यार्थिनींनी दिले. त्यावर युवकांनी प्रतिक्रिया देत अटीट्यूड दाखवू नको असं म्हणत तू माझ्यासोबत लॉजवर चल, अशा अश्लील शब्दाचा वापर करत छेड काढली. छेडखानीची घटना घडल्यानंतर दोघ अज्ञात युवक अश्लील भाषेत बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी हिम्मत दाखवत त्यांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर त्या दोघा तरुणांनी तेथून पळ काढला.हा सर्व छेडछाडीचा प्रकार झाल्यानंतर विद्यार्थिनींनी याबाबत प्राचार्यांची भेट घेत या संदर्भात तक्रार केली. मात्र महाविद्यालयाने याबाबत पोलीस कंप्लेंट करणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थिनींवरच दबाव आणल्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शहादा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छेडछाड करणाऱ्या रोडरोमियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.









