डिलिव्हरी बॉय बनून आला, पुण्यात 25 वर्षीय तरुणीवर अत्याचार; तिच्याच फोनमध्ये सेल्फी काढत लिहिलं ‘परत येईन’.

पुणे शहरातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फीही काढला आणि ‘परत येईन’ असा मेसेज टाईप केला. डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत आरोपीने सोसायटीत प्रवेश मिळवला.

त्यानंतर तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारुन दृष्कृत्य केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील गजबजलेल्या कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेल्या या प्रकारामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.पुणे शहरातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे. संबंधित सोसायटीत राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेच्या तोंडावर स्प्रे मारुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फीही काढला आणि ‘परत येईन’ असे टाईप करुन ठेवले. बुधवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला होता. महिलेने कुरिअर माझे नाही असे सांगितले, तरीही सही करावी लागेल, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे तिने सेफ्टी डोअर उघडला. त्यानंतर आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारुन बलात्कार केल्याचा आरोप आहे.दुसरीकडे, ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवून लैंगिक छळ केल्याच्या पुण्याच्या दोन प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ आणि खराडी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका प्रकरणात तक्रारदार 37 वर्षीय विवाहितेशी आरोपी तरुणाने इन्स्टाग्रामवर ओळख करुन मैत्री वाढवली होती. त्यानंतर ‘व्हिडीओ कॉल’वर नग्न होण्यास भाग पाडलं. याचे स्क्रीनशॉट काढून त्याने तक्रारदार महिलेचा मुलगा, भाऊ आणि काही ओळखीच्या व्यक्तींना व्हॉट्सॲपवर शेअर केल्याचा आरोप आहे.सऱ्या प्रकरणात 19 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने ‘इन्स्टाग्राम’वर ओळख वाढवली. भेटण्याच्या बहाण्याने तिला बोलावलं. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि काही फोटोही काढल्याचा आरोप आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.