मोठी दुर्घटना! 65 प्रवाशांना घेऊन निघालेली फेरी समुद्रात उलटली, चौघांचा मृत्यू , अनेकजण बेपत्ता.

जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराकडे ५० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अर्ध्या तासाच्या आतच ही बोट बुडाली. फेरीत एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. इंडोनेशियातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बालीजवळ एक मोठा अपघात झाला आहे. सुमारे ६५ लोकांना बेटावर घेऊन जाणारी एक फेरी बोट रात्री उलटली. या अपघातात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४१ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. फेरीतील २० जणांना वाचवण्यात यश आले आहे.

तर, बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. एएफपीने देशाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचा हवाला देत म्हटले आहे की, प्रवाशांनी भरलेली ही फेरी स्थानिक वेळेनुसार रात्री ११.२० वाजता बाली सामुद्रधुनीत बुडाली. ती इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावा येथून प्रसिद्ध पर्यटन स्थळाकडे निघाली होती.”माहितीनुसार, फेरीत एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते,” असे जावा-आधारित एजन्सीने सांगितले. जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराकडे ५० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अर्ध्या तासाच्या आतच ही बोट बुडाली.बान्युवान पोलिस प्रमुख रामा समतामा यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, बचाव पथकांना आतापर्यंत दोन मृतदेह सापडले आहेत आणि २० जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव केलेल्यांपैकी बरेच जण खवळलेल्या पाण्यात बेशुद्धावस्थेत तरंगत असताना आढळले. बेपत्ता लोकांच्या शोधात रात्रीपासून दोन टग बोटी आणि दोन फुग्याच्या बोटींसह नऊ बोटी कार्यरत आहेत. शोधकार्य सुरु असताना समुद्रात २ मीटर उंच लाटा उसळत होत्या, ज्यामुळे बचाव पथकाला अडचणी येत आहेत.अशा प्रकारचा अपघात होण्याची हि पहिलीच वेळ नसून १७,००० बेटांचा आग्नेय आशियाई देश असलेल्या इंडोनेशियामध्ये सुरक्षा मानकांचे पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बोट अपघात होत आले आहेत. लहान बेटांमुळे, वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात फेरी वापरल्या जातात. या वर्षी मार्चमध्ये, बालीच्या किनाऱ्याजवळ उसळलेल्या लाटांमुळे एक बोट उलटली, ज्यामध्ये एका ऑस्ट्रेलियन महिलेचा मृत्यू झाला आणि किमान एक जण जखमी झाला होता.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.