भडगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था – ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळती.

“रुग्णांसाठी उभं केलेलं रुग्णालय, आज स्वतः बनलंय रुग्ण!”भडगाव : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचं केंद्र असलेलं भडगावचं ग्रामीण रुग्णालय सध्या स्वतःच गंभीर आजाराने ग्रस्त झालं आहे. रुग्णांवर उपचार व्हावेत म्हणून उभं केलेलं हे रुग्णालय, आज स्वतः उपचाराच्या प्रतीक्षेत उभं आहे.

सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक माध्यमांतून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. ग्रामीण रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमधील छतामधून सतत पाणी गळत आहे, आणि हे पाणी थेट ऑपरेशन थिएटरच्या आत पडत आहे. ही बाब केवळ आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक नाही, तर वैद्यकीय नैतिकतेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा करते. ही परिस्थिती केवळ एका खोलीपुरती मर्यादित नाही – संपूर्ण रुग्णालयात पाणी गळती, भिंतींची नासधूस, स्वच्छतेचा अभाव आणि पायाभूत सुविधांची दुरवस्था दिसून येते. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होत आहे.परंतु सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या सर्व परिस्थितीकडे शासकीय इमारतींची जबाबदारी घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच आज डोळेझाक केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.