१ जुलै, मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभरात शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेण्याचा हा विशेष दिवस! या औचित्याने, लहान वाघोदा (ता. रावेर) येथील प्रगतशील शेतकरी वसंत भास्कर शिंदे यांचा महाराष्ट्रात खरीप ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मीनल करनवाल मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानाची आहे.










