आंब्याच्या झाडावर तरुण, तरुणीची बॉडी; दोघांचे गुडघे जमिनीला टेकलेले; गावात तणाव, पोलीस तैनात.

एका २० वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. परसोनी गावात ऊसाच्या शेताजवळ हे मृतदेह सापडले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.एका तरुण, तरुणीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडले आहेत. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात २० वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना परसोनी गावात घडली. ऊसाच्या शेताजवळ असलेल्या झाडावर मृतदेह आढळून आले. याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना आणि मृतांच्या नातेवाईकांना दिली. तमकुहीराज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बारकाईनं निरीक्षण केलं. राहुल निषाद आणि आशु कुशवाहा अशी मृतांची नावं आहे. दोघे एकमेकांचे शेजारी होते.पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशील कुमार शुक्ला यांनी प्राथमिक तपासानंतर काही संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधलं. ‘दोन्ही मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास आढळून आले. दोघांचे मृतदेह एकाच झाडाला लटकलेले होते. त्यांचे गुडघे जमिनीला टेकलेले होते. तरुणाच्या मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळून आले. मुलीच्या डोक्यावर जखम आढळून आलेली आहे. त्यामुळे हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अनुषंगानं तपास सुरु आहे,’ अशी माहिती शुक्ला यांनी दिली.राहुल आणि आशु यांचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. राहुल तीन बहि‍णींचा एकुलता एक भाऊ होता. त्यानं इंटरमीडिएटची परीक्षा दिली होती. या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला होता. तर आशु आठवीत शिकत होती. ती भावंडांमध्ये सर्वात धाकटी होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या कुटुंबियांचा हा संबंधांना विरोध होता.आशु आणि राहुल एकमेकांशी बोलायचे. त्यावरुन आशुच्या घरात रोज वाद व्हायचे, अशी माहिती राहुलची बहीण सिंधूनं दिली. अनेकदा भांडणं मारहाणीपर्यंत गेली. ग्राम पंचायतीच्या मध्यस्थीनं वाद शमला होता. आशुची वहिनी तिच्या मोबाईलवरुन दोघांचा संवाद घडवायची, असं सिंधूनं सांगितलं. आशु आणि राहुलच्या मृत्यूनं दोघांच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.