हभप संगीताताई महाराजांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, दोन परप्रांतीय आरोपींना अटक, धक्कादायक कारण समोर.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी परप्रांतीय मजूर आहेत. ते रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. शहरात आल्यानंतर ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला. चिंचडगाव येथील मंदिरात त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे धक्कादायक घटना घडली. एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करुन, प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. आणि त्यांनी किर्तनकार महिलेची हत्या केली.ह.भ.प. संगीता पवार यांची अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यांच्या हत्येचं नेमकं कारण अस्पष्ट होतं. अज्ञात मारेकऱ्याने आश्रमात शिरुन त्यांची हत्या केली होती. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले.

त्यांनी आत जाऊन प्रवेश केला असता संगीताताई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर अधिकारी कर्मचारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. व वेगाने या प्रकरणाची तपासचक्रे फिरवण्यात आली.ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती की, जमिनिच्या वादातून संगीता पवार यांची हत्या झाली. 14 एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात त्यांनी तक्रारही दिली. त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर संगीता पवार यांची हत्या झाल्याचं त्यांचे वडील अण्णासाहेब पवार म्हणाले होते.दरम्यान, मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीसांनी तपास करत या प्रकरणामध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत होते. अखेर या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी अटक केलेले आरोपी परप्रांतीय मजूर आहेत. ते रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. शहरात आल्यानंतर ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला. चिंचडगाव येथील मंदिरात त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संगीता पवार यांचा त्यांनी खून केला. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोघांनाही पकडले. एका आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली. तर दुसरा आरोपी वैजापूरमध्ये सापडला. पोलिसांनी मंदिरातील चोरी केलेले देवीचे दागिने आणि दानपेटी जप्त केली आहे.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.