साहेब प्लेट खूप पातळ आहे, कधीही तुटेल, पोलिसात जावं लागेल, त्यापेक्षा… कर्मचाऱ्यांचा अधिक रकमेचा आग्रह.

राज्यात हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे. हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी संस्थेचीही नेमणूक करण्यात आली आहे.शासनाने जुन्या वाहनांना नवीन हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 66 हजार 72 वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना नवीन हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविली आहे. तर एक लाख सहा हजार 142 वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी ऑर्डर बुक केली आहे. जिल्ह्यात 12 लाख 75 हजार 786 वाहनांपैकी तेरा टक्के वाहनधारकांनी हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहे. हायसिक्युरीटी नंबर प्लेट बसविण्यासाठी संस्थेचीही नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने नागरीकांना नंबर प्लेट बसविण्यासाठी विविध ठिकाणी फिटमेट सेंटर देण्यात आले आहे.

जिल्ह्यात अशा फिटमेंट सेंटरची संख्या 581 इतकी आहे. या फिटमेट सेंटरवर वाहनधारक आपल्या वाहनांची कागदपत्रे घेऊन जाऊन, त्या ठिकाणी नंबर प्लेटसाठी ऑर्डर बुक करीत आहेत.हायसिक्युरीटी नंबर प्लेट नागरिकांनी बसवावी, यासाठी छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयाच्या वतीने हायसिक्युरीटी नंबर प्लेटसाठी अर्ज न केलेल्या किंवा नवीन नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांची कामे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक वाहनधारकांची कामेही आरटीओ कार्यालयात थांबविण्यात आलेली आहे. यामुळे अनेक वाहनधारकांनी त्यांचे वाहनांची संबंधित कामे आरटीओ कार्यालयात व्हावी. यासाठी फिटमेंट सेंटरवर जाऊन, आपल्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑर्डर बुक केले आहे.आरटीओ विभागाकडून सदर कारवाईकेल्यानंतरही वाहनधारकांमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही.

आरटीओ विभागांतर्गत फक्त 12 ते 13 टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेटच्या निर्णयाला प्रतिसाद दिला आहे.एचएसआरपी नंबरप्लेट बाबत काही तक्रारी असल्यास, आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी नोंदविण्याबाबत आरटीओ विभागाचे आवाहन केले. आतापर्यंत संकेत स्थळावर 930 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. यात अतिरीक्त पैसे घेणे, ऑर्डर वेळेवर न पूर्ण करणे यासह अन्य तक्रारींचा समावेश आहे.नवी पाटी तुटण्याची भीती शहरातील अनेक फिटमेंट सेंटरवर वाहनधारक ऑर्डर घेण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी साहेब प्लेट खूप पातळ आहे. ही प्लेट कधीही तुटू शकेल. पुन्हा नंबर प्लेट बसविण्यासाठी तुम्हाला पोलिस तक्रार नोंदवावी लागेल. त्यापेक्षा आता दोनशे रुपये खर्च करून नंबर प्लेटला गार्ड लावण्याचे आग्रह करीत आहे. नंबर प्लेटसह या गार्डचाही भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.