भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने पाच विकेट्सने गमावला. आज भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाला हॉटेलमध्ये बंद केल्याचा प्रकार आता समोर आला आहे. भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने पाच विकेट्सने गमावला. आज भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाला हॉटेलमध्ये बंद केल्याचा प्रकार आता समोर आला आहे.
बर्मिंगहॅममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाच्या हॉटेलजवळ एक संशयास्पद पॅकेज आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. सेंटेनरी स्क्वेअरजवळ हे पॅकेज आढळल्याने स्थानिक पोलिसांनी तो परिसर सील केला आणि आपत्कालीन तपासणी सुरू केली, ज्यामुळे शहराच्या मध्यभागी काही काळ शांतता भंग झाली. वृत्तानुसार, भारतीय खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत ते हॉटेल देखील त्याच परिसरात आहे. या घटनेने तात्काळ चिंता निर्माण झाली आणि सुरक्षेबाबत कारवाई करावी लागली.बर्मिंगहॅम सिटी सेंटर पोलिसांनी केलेल्या पोस्टनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजण्याच्या आधी अलर्ट आला. अधिकाऱ्यांनी सेंटेनरी स्क्वेअरच्या काही भागांसह आसपासच्या परिसराला ताबडतोब घेराव घातला आणि चौकशी सुरू केली. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक इमारती रिकामी करण्यात आल्या आणि परिस्थितीचा आढावा येईपर्यंत लोकांना त्या ठिकाणापासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला.









