मुंबईतील नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेने विद्यार्थ्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेत नको ते केलं!

मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमधील शिक्षिकेला तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्यावर वर्षभर अत्याचार केले, ज्यात पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेऊन लैंगिक संबंध ठेवणे आणि दारू पाजणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षिकेने तिच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला शिकवत होती. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप बनवताना शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली आणि जानेवारी 2024 मध्ये तिने त्याला पहिल्यांदा लैंगिक संबंधासाठी मागणी घातली, असे तक्रारीत म्हटले आहे.सुरुवातीला मुलगा तयार नव्हता आणि त्याने तिला टाळायला सुरुवात केली. शिक्षिकेने तिच्या एका मैत्रिणीला विद्यार्थ्याला फोन करायला लावला. ती मैत्रीण शाळेतील नव्हती.

त्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितले की, मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलांमधील संबंध आता सामान्य झाले आहेत. “ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात,” असंही मैत्रिणीने विद्यार्थ्याला सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.मैत्रिणीच्या फोननंतर, विद्यार्थ्याने शिक्षिकेला भेटण्याचा निर्णय घेतला. “शिक्षिकेने त्याला तिच्या गाडीतून एकांतात नेले, त्याचे कपडे काढले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्याला खूप anxiety येऊ लागली, त्यामुळे शिक्षिकेने त्याला anxiety कमी होण्याची औषधे देखील दिली. त्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि विमानतळाजवळ नेऊन अनेकवेळा लैंगिक संबंध ठेवले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका त्याला अनेकदा दारू पाजत असे.

या घटनेनंतर काही महिन्यांनी, विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना त्याच्या वागण्यात बदल जाणवला आणि त्यांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी विचार केला की काही महिन्यांत तो शाळा सोडणार आहे, त्यामुळे त्यांनी याबद्दल वाच्यता न करण्याचे ठरवले. त्यांना वाटले की शिक्षिका त्याला त्रास देणे थांबवेल.यावर्षी मुलाने बोर्डाची परीक्षा पास केली आणि तो शाळेतून बाहेर पडला, पण तो नैराश्यात गेला, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याला भेटायला बोलावले. यावेळी मात्र पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या संयम संपला आणि त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली.दरम्यान, याप्रकरणी लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (POCSO Act), 2012 च्या कलम 4 (लैंगिक अत्याचार), कलम 6 (गंभीर लैंगिक अत्याचार) आणि कलम 17 (गुन्ह्यासाठी मदत करणे) तसेच भारतीय न्याय संहिता आणि किशोर न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.