आर्थिक संकटाने घेरले, राज्यात ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली; तीन महिन्यांतील भयावह वास्तव.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मराठवाड्यातील ५०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात सर्वाधिक १२४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत.शेतकरी आत्महत्येचे भीषण चित्र काही पुसट होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. यातच आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकरी आत्महत्या झाल्या, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे. लेखी उत्तराद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
विधानपरिषदेत राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबद्दल विरोधी पक्षाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. यावर लेखी उत्तर देताना मंत्री मकरंद पाटील यांनी नमूद केले की, ‘जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत शेतकरी आत्महत्यांची एकूण ७६७ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी ३७३ प्रकरणे पात्र ठरली आहेत आणि २०० प्रकरणे अपात्र घोषित करण्यात आली आहेत.

सुमारे १९४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडत आहेत. गेल्या सहा महिन्यांत मराठवाड्यातील ५०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात सर्वाधिक १२४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात मराठवाड्यातील ९४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते.मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेले आर्थिक गणित, अशा या चक्रात शेतकरी सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. यात त्यात गेल्या सहा महिन्यांत मराठवाड्यातील ५०१ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. यात जानेवारी महिन्यात विभागात ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

फेब्रुवारी महिन्यात ७५, मार्च महिन्यात ११०, एप्रिल ८९, मे महिन्यात ७६, तर जून महिन्यात ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२४ घटना दुर्दैवी घटना घडल्या असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अन्य जिल्ह्यांतही शेतकरी आत्महत्यासत्र कायम आहे. दरम्यान, आतापर्यंत २९७ आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळाली. १४४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले. साठ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले.१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान मराठवाड्यातील ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय अहवालात नमूद आहे. बीडमध्ये २०५, नांदेडमध्ये १६७, तर छत्रपती संभाजीनगरात १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विभागात डिसेंबरमध्ये सर्वाधिक १०९ आत्महत्या झाल्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.