हिंजवडी आयटी पार्कमधील नैसर्गिक ओढे-नाले बुजवणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले जाणारेत. अशी घोषणा पीएमआरडीए महानगरचे आयुक्त योगेश म्हसे यांनी केलीय.शरद पवारांचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कचं वॉटर पार्क (Hinjewadi IT Park) नेमकं कोणामुळं झालं? किंबहुना, पवार कुटुंबाचं राजकारण त्यासाठी कारणीभूत आहे का? असा सवाल आता विचरला जाऊ लागला आहे. कारण खासदार सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाचा भाग असलेल्या हिंजवडीचा कारभार पालकमंत्री म्हणून अजित पवार पाहतात. असं असताना जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वॉटर पार्क अशी ओळख निर्माण झाली, त्यामुळं चहुबाजूंनी टीका झाली.










